This is the title of your first blog post
मला मान्य आहे की हे सगळंच आपल्या कुंपणाबाहेरचं आहे. खिडकीतून हात बाहेर न काढण्याची खबरदारी घेत आपण आपापल्या चौकोनात सुरक्षित आहोत. तू अजाण नाहीस आणि भावनाशून्यही नाहीस. जगरहाटीचं शहाणपणही आहे तुझ्याकडे कदाचित माझ्यापेक्षा खूप जास्त. पण काही अंशी .... नाही नाही पूर्णांशी तटस्थ मात्र आपण दोघेही आहोत. पण आपण फक्त सुपात आहोत. जेव्हा वेळ आपल्यावर येईल तेव्हा आत्ता जात्यात असणारे आणि तेव्हा सुपात असणारेही, "राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" असा रोखठोक सवाल उभा करतील. आणि तेव्हा आपल्याकडे उत्तर नसेल. पण काळजी करू नकोस, तेव्हाही मी तुझीच बाजू घेईन.आता मी हे असं काहीतरी बोलतो कारण तुझ्याशी बोलताना शब्द मोजून मापून बोलण्याचा ताण नसतोमनावर. आणि बोलून दम लागला की असं मध्यात तोडलं तरी चालतं तुला.